Rules

शिवराज मराठा वधू वर सूचक केंद्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे
देशातील एक नामांकित वधू - वर केंद्र
(प्रोप्रा. - अ‍ॅड. शिवराज जाधव)

कामकाजाची वेळ : सकाळी १० ते सायं ५


ऑफिस : पुणे व सातारा.
 

* केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये *

    १) मराठा समाजासाठी एक विश्वसनीय विवाह माध्यम.
    २) केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील प्रथम, घटस्फोटित, विधवा, विधूर व अपंग स्थळांची नोंदणी केली जाते.
    ३) सन २०१३ सालापासून यशस्विरित्या कार्यरत.
    ४) उच्चशिक्षित वधू -वरांची भरपूर स्थळे.
    ५) अपंगांसाठी पूर्णतः मोफत सेवा.
    ६) आजपर्यंत प्रथम, घटस्फोटित, विधवा, विधूर व अपंग तसेच शेतकरी मुलांची लग्ने जमविली आहेत.
    ७) केंद्रात फक्त नोंदणी केली जात नाही, तर त्यासोबत कशा पद्धतीने स्थळे पहावीत जेणेकरून लग्न लवकर जमण्यास मदत होईल याचे मार्गदर्शन देखील केले जाते.
    ८) लग्नासाठी सध्या बायोडाटा हा फार महत्वाचा भाग आहे. आपल्या इथे तुम्हाला सुयोग्य व उत्कृष्ट असा बायोडाटा बनवून तो Whats app वर सुद्धा पाठविला जाईल व भविष्यात तुमच्या बायोडाटा मध्ये काही बदल असल्यास मोफत करून पाठविला जाईल. बायोडाटा शुल्क फक्त १०० रुपये राहील.
    ९) "Personal Assistant" (मध्यस्थी सुविधा) हि एक विशेष सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये तुमच्या स्थळावर वैयक्तिक लक्ष दिले जाते व तुम्हाला तुमच्या अपेक्षे प्रमाणे स्थळे शोधून Whats app द्वारे देखील पाठविली जातात. व लग्न जुळवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जातात. (मध्यस्थी सुविधे विषयी सविस्तर माहितीसाठी कृपया "९४०४५००३७८" या नंबर वर संपर्क करावा.


* नियम व अटी *

    १) येथे फक्त मराठा समाजातील वधू -वरांनीच नोंदणी करावी.
    २) नाव नोंदणीसाठी वेबसाईट / अँप वरून ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा ऑफिस मध्ये येवून देखील नोंदणी करता येईल.
    ३) वेबसाईट / अँप वर फक्त उच्चशिक्षित स्थळांनीच फॉर्म भरावा. वार्षिक नाव नोंदणी फी : २०००/- रुपये व सहामाही नाव नोंदणी फी : १६००/- आहे.
    ४) सदर फी नोंदणी करताना सुरुवातीला भरावी लागते.
    ५) नाव नोंदणी फी भरल्यानंतरच तुम्हाला स्थळांची पूर्ण माहिती मिळते.
    ६) पसंतीनंतर मुलाचे / मुलीचे पै- पाहुणे, स्वभाव, वर्तुवणूक, रोगराई, अफेअर, व्यसन, स्थावर मालमत्ता, शैक्षणिक पात्रता, नोकरी, व्यवसाय इ. संबंधित माहिती आपल्या जबाबदारीवर करावी.
    ७) आपण घेतलेल्या स्थळांची माहिती आपण स्वतः करून घ्यावी किंवा आपले मित्र, नातेवाईक यांच्यामार्फत करावी.भविष्यात कोणतेही प्रश्न किंवा अडचणी उद्धभवल्यास त्यास केंद्र जबाबदार राहणार नाही. तरी ती सर्व जबाबदारी सभासदांची आहे.
    ८) लग्नांनंतर उध्दभवणाऱ्या चांगल्या अगर वाईट परिस्थितीस आपण केंद्रास जबाबदार धरू नये.
    ९) नाव नोंदणी केलेनंतर विवाह जमलेच किंवा ठराविक कालावधीत विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देत नाही.
    १०) नोंदणी केलेनंतर सभासदांनी आपल्या स्थळास मिळत्या जुळत्या व अनुरूप असलेल्या स्थळांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधावा.
    ११) विवाह योग केंद्रातर्फे अगर तुमच्या स्व-प्रयत्नाने जुळून आल्यास त्याची माहिती केंद्रास कळवावी. केंद्रातर्फे लग्न जमल्यास कोणतीही देणगी मागितली जात नाही.
    १२) एकदा घेतलेली फी कोणतेही कारणास्तव परत दिली जात नाही.
    १३) केंद्राकडून घेतलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करताना आढळल्यास त्याचे सभासदत्व रद्द केले जाईल.
    १४) मेंबरशीप रद्द करणे किंवा सभासदांना नवीन ऑफर्स देणे याबाबत अंतिम निर्णय केंद्राचे असतील.


* वेबसाईट विषयी माहिती *

    १) वेबसाईट / अँप वरील "Enroll Biodata" या पर्यायावरून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना पेमेंट व मुदत चा पर्याय सिलेक्ट करून फॉर्म Submit करावा.
    २) ) फॉर्म भरताना "ID Photo" upload केल्यास तुमच्या Profile ला "Verified Profile" असा मार्क येईल. सदर "Profile Verification Mark" हे फक्त नाव व जन्मतारीखेचे Verification दर्शवते.
    ३) फॉर्म Submit केलेनंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून रजिस्ट्रेशन करता येईल.
    ४) पेमेंट केलेनंतर आपल्या ऑफिस द्वारे तुमची प्रोफाइल Approved केली जाईल व तुम्हाला E-mail द्वारे तुमचा Password मिळेल.
    ५) तुमचा E-mail id हाच तुमचा Login ID असेल.
    ६) नोंदणी नंतर तुम्ही Login ID व Password द्वारे Login करून पसंत आलेल्या स्थळांचे फोन नंबर, प्रत्येक Profile च्या खाली दिलेल्या "Show Contact Details" या वर क्लिक करून घेऊ शकता.
    ७) दर आठवड्याला १० स्थळांचे नंबर तुम्हाला घेता येतील.
    ८) तुम्ही नंबर घेतलेल्या स्थळांना SMS द्वारे तुमचा Interest पाठविला जाईल.
    ९) "Chek Your Horoscope Score" यावर क्लिक करून तुम्ही तुम्हाला पसंत आलेल्या स्थळांचे मोफत गुणमिलन पाहू शकता.
    १०) वेबसाईट / अँप वरील Search पर्यायावरून तुम्हाला उंची, वय, शिक्षण, मंगळ, व्यवसाय, सरकारी /खाजगी नोकरी, मूळ गाव इ. सह अचूक स्थळे शोधता येतात.
    ११) माहिती किंवा फोटो बदलायचे असल्यास Login करून तुम्हाला बदलता येतील.
    १२) "Success Stories" मधून जमलेल्या लग्नांची यादी पाहता येते.
    १३) वेबसाईट वापरताना कोणतीही अडचण / प्रश्न असल्यास "९४०३५५००८७" या नंबर वर ऑफिस वेळेत फोन अथवा whats app वरून मेसेज करा
    .

     

    धन्यवाद.
    शिवराज मराठा वधु वर सूचक केंद्र®

Latest BioData